![]() |
| कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरस पासून स्वतःला कसे वाचवायचे? |
कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरस पासून स्वतःला कसे वाचवाल?
कोरोनाव्हायरस रोग २०१९ ( Coronavirus Disease 2019, Covid-19)
कोरोनाव्हायरस हा एक प्रकारचा विषाणू आहे. असे बरेच प्रकारचे विषाणू अगोदरपासूनच आहेत. परंतु नव्याने आलेला कोरोना व्हायरस (Covid- 19) म्हणून ओळखला जाणारा विषाणू सार्स-कोव्ह -2 (SARS-CoV-2) हा जगभरात सर्वत्र (साथीचा रोग ,Pandemic) आजार होण्यास कारणीभूत आहे. हा रोग एक तीव्र संसर्गजन्य श्वसन रोग आहे.
कोरोना व्हायरस (Novel Coronavirus - 2019 - Covid-19), या आजारावर सध्या कोणतेही औषध सापडलेले नाही. कोरोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे परंतु जगापेक्षा भारतामध्ये कोरोना व्हायरसचे पेशंट बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे ही बाब आपल्यासाठी चांगली आहे. तरीही आपल्याला कॉरोन होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अतिशय चांगले.
कोरोनाला घाबरण्याचे मुख्य कारण म्हणजे या आजाराची सुरुवातीची लक्षणे सर्दी, खोकला आणि तापासारखीच आहेत, त्यामुळे सामान्य जनतेला या दोन्हींमधील फरक ओळखणे फार कठीण जात आहे.
जर कोरोना विषाणूची लागण झालेला व्यक्ती खोकला किंवा शिंकला तर त्यांच्या तोंडातून विषाणूंचे बारीक कण हवेमध्ये पसरतात. हेच कोरोनाचे कण आपल्या नाकावाटे किंवा तोंडावाटे शरीरात जातात व आपल्याला कोरोनाची लागण होते.
अशा परिस्थितीत, खोकला आणि शिंका येताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे, शकतो बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे, हात न धुता आपल्या तोंडाला स्पर्श न करणे आणि संक्रमित झालेल्या व्यक्तीशी संपर्क टाळणे हे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी फार महत्वाचे आहे.
ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली आपणास दिसून येते. त्यामुळेच कोवीड-१९ चे ज्यादातर रुग्ण हे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, अशक्त व्यक्ती, तसेच जे पहिल्यापासून कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह तसेच टीबी यांसारख्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. जर जगभरातील कोरोनामुळे मेलेल्यांची संख्या पहिली तर हेच दिसून येते.
कोरोना विषाणूची लक्षणे कोणती आहेत?
कोरोना विषाणूची लक्षणे ही सामान्य तापाप्रमाणेच असतात. मानवी शरीरावर पोहोचल्यानंतर कोरोनाचा विषाणू फुफ्फुसात संक्रमित होतो. यामुळे प्रथम ताप यायला सुरुवात होते आणि त्यानंतर कोरडा खोकला सुरु होतो. खोकल्यामुळे घसा दुखी चालू होते. नंतर श्वास घेण्याची समस्या चालू होते.
कोवीड-१९ ची काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे:
🔴 सर्दी, थंडी वाजून येणे - यामुळे रुग्णाचे शरीर थंड होऊ लागते
🔴 अंग जड होणे, स्नायूमधे वेदना होणे, सांधेदुखीचा त्रास वाढणे.
🔴 ताप वाढणे
🔴 तीव्र डोकेदुखी, गरगरणे, चक्कर आल्यासारखे वाटणे.
🔴 खोकला - घसा दुखी, घश्याला सूज येणे, घसा खवखवणे, शिंका येणे.
🔴 फुप्फुसांना सूज येणे - जास्त खोकल्यामुळे फुफ्फुसांना सूज येऊ शकते व छातीत दुःखू लागते.
🔴 धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खूपच अशक्त वाटणे.
🔴 चव किंवा गंध कमी होणे
🔴 बोलणे किंवा हालचाल करणे हळूहळू कमी होणे
खोकला, डोकेदुखी, सौम्य ताप यासारखी किरकोळ लक्षणेही सामान्य माणसाला नेहमीची वाटणारी लक्षणे आहेत त्यामुळे कोरोना व सामान्य ताप यामधील अंतर ओळखणे फार अवघड जाते. तसेच, कोरोनाचा उष्मायन कालावधी (Incubation Period) हा साधारण पणे १४ दिवस इतका दीर्घ असतो. जर आपल्याला वर सांगितलेली लक्षणे ही ७ ते १० दिवस एकसारखीच राहिली किंवा त्रास जास्तच वाढत चालला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा वैद्यकीय मदत जितके होईल तितके लवकर घ्या.
![]() |
| कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरस पासून स्वतःला कसे वाचवायचे? |
कोरोना होऊ नये यासाठी काय काळजी घ्याल?
सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचना पाळा व कोरोना व्हायरस (COVID-19) पासून स्वत: चे आणि इतरांचेही संरक्षण करा. आपण काही सामान्य सावधगिरी बाळगून कोरोना व्हायरसचे संक्रमण होण्याची किंवा तो इतरांमध्ये पसरण्याची शक्यता कमी करू शकता.
🔵 शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी पोषक आणि आरोग्यदायी आहार घ्या.
🔵 स्वच्छतेचे नियम पाळा.
🔵 साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा.
🔵 आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा.
🔵 खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा आणि शक्यतो मास्क वापरा.
🔵 बाहेर गेल्यावर कोणत्याही वस्तूला हात लावू नका तसेच जर हात लावण्याची वेळ आलीच तर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
🔵 बाहेर जाताना नेहमी मास्क वापरा.
🔵 गरज नसताना गर्दीमध्ये जाण्याचे टाळा.
🔵 ज्यांना सर्दी, खोकला झालेला आहे अशा लोकांशी संपर्क टाळा.
🔵 परदेशातून आलेल्या पाहुण्यांना किंवा मित्रांना लगेच भेटायला जाऊ नका.
जर असे लोक तुमच्या घरा शेजारी राहत असतील तर त्यांच्याशी संपर्क टाळा.
🔵 जर कुणाला भेटायला किंवा बाहेर गेलात तर स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी 1 मीटर (3 फूट) अंतर ठेवा.
🔵 खोकला, डोकेदुखी, सौम्य ताप अशी किरकोळ लक्षणे असली तरी आपण बरे होईपर्यंत घरीच रहा आणि स्वत:ला व इतरांना कोरोना विषाणूपासून अलग ठेवा.
🔵 जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागला तर वैद्यकीय सल्ला घ्यायला विसरू नका आणि आपल्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून योग्य ते निर्देश दिले जातात त्यांचे अनुसरण, पालन करा. ते आपले संरक्षण देखील करेल आणि व्हायरस आणि इतर जंतू संसर्गाचा फैलाव रोखण्यास देखील मदत करेल.
🔵 डब्ल्यूएचओ किंवा आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळणाऱ्या विश्वसनीय माहितीकडे लक्ष ठेऊन राहा.


1 Comments
Micro Titanium trim - TITNIA ART and Art
ReplyDeleteby L J titanium welding Finklof · 2020 · Cited by 8 — Micro titanium easy flux 125 amp welder titanium trim is an cobalt vs titanium drill bits essential tool for successful titanium coating entrepreneurs. In addition, this makes it an attractive and versatile tool. powerbook g4 titanium