लहानपाणी अजी अजोबा अपनाला कोडी घालत असत आणि त्याचे उत्तर विचारत असत पण आपल्याला त्याचे उत्तर क्वचितच महिती असे. मग अजी अजोबांना उत्तर सांगा म्हणून त्यांच्या मागे लागवे लागत असे. परंतु उत्तर लवकर भेटत नसे.
कधी कधी तर तर 2-3 दिवस लगायचे उत्तर माहिती व्हायला. पण यामध्ये खूपच मजा यायची . अशीच कही मजेदार, फनी मराठी कोडी (Marathi Kodi), शब्दकोडी व उत्तरे येथे तुमच्यासाठी कलेक्ट करत आहे. तुम्हाला ही मराठी कोड़ी नक्कीच आवडतील व कही तुम्हाला आगोदरच माहिती असतील. अशीच गमतीदार कोड़ी तुमच्याकडे असतील तर ती कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. शेअर करायला विसरु नका!
![]() |
Hirvi Peti Katyat Padleli - Majedar Marathi Shabdkodi |
🤔 हिरवी पेटी काट्यात पडलेली, उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली
उत्तर ➤ भेंडी
![]() |
Supbhar Lahya Tyat Ek Rupaya - Marathi Shabdkodi |
🤔 सुपभर लाह्या त्यात एक रुपया
उत्तर ➤ चंद्र आणि चांदण्या
![]() |
Eka Hirvya Gharachya Aat Ek Pandhare Ghar Aahe - Marathi Shabdkodi |
🤔 एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे.
पांढऱ्या घराच्या आत लाल घर आहे.
लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत.
ओळख पाहू मी कोण?
उत्तर ➤ कलिंगड, हिरवा घर = वरील बाजू, पांढरा घर = त्यापुढील बाजू, लाल घर आणि त्यात खूप साऱ्या कलिंगडाच्या बिया
![]() |
Evdhasa Karta Ghar Kasa Rakhate Marathi Shabdkode |
🤔 एवढंसं कार्ट घर कसं राखतं
उत्तर ➤ कुलूप
🤔 हजार येती हजार जाती, हजार बसती पारावर,
अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर
उत्तर ➤ बस / ट्रेन.
![]() |
Asa Kuthala Khajana Aahe Jo Jevadha Lutu Tevhadha Vaadhat Jato Marathi Shabdkode |
🤔 असा कुठला खजाना आहे जो जेवढा लुटू तेवढा वाढत जातो?
उत्तर ➤ ज्ञानाचा खजाना
![]() |
Sonyachi Suri Bhuit Puri |
🤔 सोन्याची सुरी भुईत पुरी, वर पटकार गमजा करी
उत्तर ➤ गाजर
![]() |
Kontya Falachya Potat Daat Astaat |
🤔 कोणत्या फळाच्या पोटात दात असतात?
उत्तर ➤ डाळिंब
![]() |
असे काय आहे जे... |
🤔 असे काय आहे जे गिळले जाऊ शकते परंतु कधी कधी ते सुद्धा तुम्हाला गिळून टाकू शकतात?
उत्तर ➤ अहंकार/गर्व
🤔 एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?
उत्तर ➤ सीताराम
🤔 सगळे गेले रानात, अन् झिपरी पोरगी घरात
उत्तर ➤ केरसुणी
🤔 अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाण वरून हालत नाही?
उत्तर ➤ रस्ता
🤔 लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही,
आड आहेपण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही
उत्तर ➤ लालकृष्ण आडवाणी( माणूस )
🤔 त्याशिवाय प्रवास करा आणि आपण कधीही विजयी होणार नाही, परंतु जर का ते आपल्याकडे जास्त असेल तर आपण नक्कीच अपयशी देखील व्हाल.
उत्तर ➤ आत्मविश्वास
🤔 एक गुहेचे दोन रक्षक, दोन्ही उंच व दोन्ही काळे?
उत्तर ➤ मिशा
🤔 मुकूट याच्या डोक्यावर, जांभळा झगा अंगावर
उत्तर ➤ वांग
🤔 पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो
उत्तर ➤ कंडक्टर / बस वाहक
🤔 पाणी नाही, पाऊस नाही,
तरी रान कसं हिरवं ,
कात नाही,चुना नाही,
तरी तोंड कसं रंगल
उत्तर ➤ पोपट
🤔 सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकता का?
उत्तर ➤ काल, आज आणि उद्या
🤔 पाटिल बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब
उत्तर ➤ कणीस
🤔 मी नेहमी पुढे असतो आणि मागे कधीच नसतो. ओळखा पाहू मि कोण आहे?
उत्तर ➤ भविष्य / future
![]() |
Pandhara Patela Pivala Bhat |
🤔 पांढरं पातेलं पिवळा भात
उत्तर ➤ अंड
🤔 दोन देखणी मुले, रंग ज्यांचा एकच, वेगळे झाले तर त्यांचा नाही काहीच उपयोग?
उत्तर ➤ शूज
![]() |
Don Bhau Shejari Bhet Nahi Janmantari |
🤔 दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी
उत्तर ➤ डोळे
🤔 पंख नाही, तरीही ते हवेत उडते, हात नाही तरीही भांडते. सांगा पाहू मी कोण?
उत्तर ➤ पतंग
🤔 तीनजण वाढायला बाराजण जेवायला
उत्तर ➤ घड्याळ
🤔 मी आयुष्यात एकदाच येतो, मी परत परत येत नाही.
जो मला ओळखत नाही त्याला आयुष्यभर पश्चात्ताप होतो?
उत्तर ➤ संधी / Opportunity
🤔 मी एकमेव अवयव आहे ज्याने माझे स्वतःच स्वतःचे नाव ठेवले आहे. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर ➤ मेंदू
🤔 कोकणातनं आली सखी, तिच्या मानेत दिली बुक्की, घर भरून झाल्या लेकी ?
उत्तर ➤ लसूण
🤔 कोकणातनं आली नार,
तिचा पदर हिरवागार,
तिच्या काखेला प्वार
उत्तर ➤ काजू (फळासकट)
🤔 असे काय आहे जे आपल्या बुटांसोबत नेहमी झोपायला जाते?
उत्तर ➤ घोडा
🤔 तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई
उत्तर ➤ चूल आणि तवा
🤔 मी हिरवा आहे पण मी पान नाही. मी अनुकरण करणारा आहे परंतु मी वानर नाही.
सांगा पाहू मी कोण?
उत्तर ➤ पोपट
🤔 कोकणातनं आला भट, धर की आपट
उत्तर ➤ नारळ
🤔 काय आहे जिच्या डोळ्यात बोटे टाकली तर ती तोंड उघडते?
उत्तर ➤ कात्री
🤔 तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला
उत्तर ➤ लवंग
🤔 डोळा आहे पण पाहू शकत नाही?
उत्तर ➤ सुई
🤔 चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!
सांगा काय आहे ?
उत्तर ➤ कॅरम बोर्ड गेम
🤔 अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढते पण कधीही कमी होत नाही?
उत्तर ➤ वय / वेळ
🤔 कोकणातनं आली सखी,
तिच्या मानंवर दिली बुक्की ,
तिच्या घर भर लेकी-
उत्तर ➤ लसूण
🤔 माझ्याकडे बऱ्याच कीज/keys आहेत परंतु लॉक उघडू शकत नाही?
उत्तर ➤ कीबोर्ड
🤔 कुट कुट काडी पोटात नाडी,
राम जन्मला हातजोडी
कृष्ण जन्मला हात जोडी
उत्तर ➤ देवर्यातील घण्टी / टाळ
🤔 अशी कोणती गोष्ट आहे ज्याला पाणी प्यायला दिल्याने ते मरून जाते?
उत्तर ➤ आग
🤔 काट्याकुट्यांचा बांधला भारा, कुठं जातोस ढबुण्या पोरा
उत्तर ➤ फणस
🤔 कोणते फळ आहे जे कच्चे असताना गोड लागते आणि पिकल्यावर ते आंबट होते?
उत्तर ➤ अननस
🤔 कांड्यावर कांडी सात कांडी, वर समुद्राची अंडी
उत्तर ➤ ज्वारीचे कणीस
🤔 तीन अक्षरांचे ज्याचे नाव, उलट असो किव्हा सरळ, प्रवासाचे आहे मुख्य साधन,असेल हिम्मत आर सांगा त्याचे नाव?
उत्तर ➤ जहाज
🤔 एवढीशी नन्नुबाय, सार्या वाटनं गीत गाय
उत्तर ➤ शिट्टी
🤔 प्रत्येकाकडे मी आहे आणि माझ्याशिवाय तुम्ही लांब जाऊ शकत नाही. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर ➤ एक सावली
🤔 इथेच आहे पण दिसत नाही
उत्तर ➤ वारा
🤔 आहे मला मुख,परंतु खात नाही,
दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,
माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही
वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही,
मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून
उत्तर ➤ नदी
🤔 आपण मला आपल्या हातात धरू शकता आणि तरीही मी संपूर्ण खोली भरू शकतो. ओळखा पाहू मी कोण?
उत्तर ➤ एक प्रकाशित ब्लब
Atangan Patangan Lal Lal Raan - Marathi Shabdkode |
🤔 आटंगण पटंगण लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान
उत्तर ➤ तोंड (दात आणि जीभ)
अशी कोणती गोष्ट आहे जी थंडी मध्ये सुद्धा वितळते |
🤔 अशी कोणती गोष्ट आहे जी थंडी मध्ये सुद्धा वितळते?
उत्तर ➤ मेणबत्ती
🤔 असे काय आहे जे कोणाला नको आहे, परंतु कोणीही गमावू पण इच्छित नाही?
उत्तर ➤ न्यायालयातील खटला
🤔 एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे; संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी, फोन आणि एक चहाचा कप आहे. जर स्पोट झाला तर सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?
उत्तर ➤ बॉम्बचा
मराठी शब्दकोडी
0 Comments