मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes for Daughter in Marathi

बर्थडे, जन्मदिवस, वाढदिवस, अभिष्टचिंतन कोणतेही नाव द्या पण वाढदिवस म्हटले की लहानांपासून ते बुजुर्ग मंडळी पर्यंत सर्वांसाठी हा क्षण खुपच खास असा असतो. आणि हा Special बर्थडे धूम धडाक्यात साजरा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. मग सुरु होते खास अश्या दिवसाला साजरे करण्याची एकाच लगबग.

आई वडिलांच्या जीवनातला आनंदाचा क्षण म्हणजे मुलीचा जन्म. घरात मुलीचा जन्म होणं ही खूप भाग्याची व पुण्याची गोष्ट समजली जाते. कारण भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की, मुलीच्या रूपात प्रत्यक्षात लक्ष्मीच आपल्या घरी अवतरते. म्हणूनच आई-वडील आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करतात, घरामध्ये तिचे लाड हे जास्त प्रमाणात केले जातात. 

वास्तविक दाग-दागिन्यांपेक्षा मुलगी हा खुप मोठा दागिना आहे. ती आपल्या लाडक्या वडिलांची परी असते. आयुष्याचा आनंद बनून आलेल्या लहान परीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याची इच्छा तिच्या आई बाबांची असते. आपल्या लाडक्या परीला दीर्घायुष्य लाभावं आणि तिला वाढदिवशी आनंदी ठेवण्यासाठी आईवडील व  घरातील सर्व मंडळी प्रयत्नशील असतात. अशा खास वाढदिवशी तिला गिफ्ट आणि भेटवस्तूंसोबत काहीतरी वेगळा असा शुभेच्छा संदेश द्यायचा असतो. तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शब्दांची गुंफण चालू असते. मग चालू होते एकच शोधाशोध अन सर्चिंग (गूगल वर). Happy Birthday, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चला तर मग आम्ही आपल्या सोयीसाठी अशाच सुंदर-सुंदर शब्दांची गुंफण केलेले मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी तुमच्या खास परीला शुभेच्छा देण्यासाठी Birthday Wishes in Marathi, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes in Marathi for Daughter, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे काही खास संदेश चे एक Collection इथे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आपणास हे बर्थडे शुभेच्छा मेसेज आवडल्यास शेअर करायला विसरू नका. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes in Marathi for Daughter Happy birthday wishes for daughter in Marathi Baddy SMS, Messages, Status, Bddy
Yenari Anant Varshe - Birthday Wishes for Daughter in Marathi



येणारी अनंत वर्षे तुझ्यावर...
सुख, समृद्धीची बरसात होवो...
तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो...
ही परमेश्वराकडे  प्रार्थना... 
वाढदिवसानिमित्त शोनुलीला शुभाशिर्वाद!
जन्मदिनाच्या खूप-खूप शुभेच्छा!
Happy Birthday My Dear Love!


जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा 
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!



उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी...
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी...
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी...
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Baddy to You My Princess



व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!!!
माझ्या गोड-गोड परीला... जन्मदिनाच्या शुभेच्छा!



आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!
Happy Birthday My Cute Daugher! Love You



सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे,
कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे
आणि आजच्या या खास दिवशी तुला
उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday My Dear.



मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला...
तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता.
त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे.
तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या सोनुलीला...



आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!



आजचा दिवस खास आहे...
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
Happy birthday to my princess.



Happy Birthday Wishes For Daughter In Marathi

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes in Marathi for Daughter Happy birthday wishes for daughter in Marathi Baddy SMS, Messages, Status, Bddy
Mazi Duniya Tuch Aahes - Birthday Wishes for Daughter in Marathi



माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.
Happy Birthday to You My Daughter!



तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी-पप्पाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमचं विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Happy birthday my princess.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा



या अनमोल दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच इच्छा!
माझ्या सोनपरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!



मला आज ही तो दिवस आठवतोय,
ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाचा होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या बाबांकडे पाहत होतीस...
जणू बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि
एक सुरक्षित भविष्य शोधत होतीस.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you

Happy birthday wishes for daughter in Marathi



या आनंदाच्या दिवसी
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!



तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
Wish You Happy Birthday My Dear!



तुझ्या जन्माने दुःख विसरले,
तुझ्या जन्माने सुख अनुभवले...
तुझं असणं श्वास आहे माझा...
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!



या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो!
यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य
तुझ्या पायाशी लोटांगण घेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday To You.



उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या
परीला बाबांकडून वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
Wish You Happy Birthday My Dear Love!



माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं
तु एक सुंदर फुल आहेस...
तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं
तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं ही ईच्छा...!!!!!
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!



तुझ्या जन्माने दुःख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारखं बहरलं.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!



हे फूल खूपच प्रेमळ आणि कोमल आहे
ते आनंदाने आणि प्रेमाने जगू शकेल.
हलत-डुलत वाऱ्याच्या झोतामध्ये...
माझ्या कोमल-कोमल फुलाला
वाढदिवसाच्या सुगंधीत शुभेच्छा!



मी आशा करतो कि हे वर्ष तुला
पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच,
यश किर्तीचं आणि सुखाचं जावो!
आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे,
कारण आज तुझा जन्मदिवस आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday To My Dear Sweet Daughter



मोठी झालीस तू आज हे अगदी खरं...
पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का?
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं... अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं... जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं...
ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!



या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे
आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!



अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून
अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!



मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday Wishes in Marathi for Daughter Happy birthday wishes for daughter in Marathi Baddy SMS, Messages, Status, Bddy
Jivnat Yenara Pratyek Divas - Birthday Wishes For Daughter In Marathi



जीवनात येणारा प्रत्येक दिवस
हा माझ्या परीचाच असावा...
जीवनात तुझ्या कधीच दुःखाचा क्षण नसावा...
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे...
तुझ्या प्रयत्नांना नेहमी उदंड यश लाभावे...
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा...
परी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!



माझं विश्व तू, माझं सुख तू,
माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,
तूच माझ्या जगण्याची आशा, तूच माझा श्वास
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास



तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस,
तूच आमचा जीव आणि प्राण आहेस...
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद,
एकच इच्छा प्रभूचरणी व्हावे जीवन तुझे स्वछंद...
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!



दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला



मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही...!



आजचा दिवस खास आहे कारण
आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.



सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या  शुभदिनी तुला
जे-जे हवे ते सारे काही मिळावे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो...
यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान
तुझ्यासोबत कायम नांदो...
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!



आपण हे वाचले का?

Post a Comment

1 Comments

  1. Hi, your blog is really nice and nicely helps us. You need more online presence in your website to help us for get knowledge.
    also see my articles.

    dear daughter मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

    ReplyDelete