सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.
४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’
‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’
0 Comments