![]() |
बुद्धिमान व्यक्तींची लक्षणे काय असतात? |
खरंतर बुद्धिमान व्यक्ती सहसा समोरच्याला किंवा कोणत्याच व्यक्तीला स्वतःबद्दलची कोणतीच गोष्ट जाणून घेऊ देत नाहीत.
म्हणून शास्त्रज्ञांनी बुद्धिमान माणसांची काही लक्षणे किंवा गुणधर्मांची एक लिस्ट तयार केली आहे. जर या लिस्टमधले गुण किंवा लक्षण एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर ती व्यक्ती हुशार आहे असे समजावे.
अल्बर्ट आइन्स्टाइन असे म्हणायचे की, माझ्यामध्ये असे कोणतेही स्पेशल टॅलेंट नाही, परंतु मला नव-नवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप इच्छा आहे.
बुद्धिमान व्यक्तींची लक्षणे >
जर आपल्याला किंवा एखाद्या व्यक्तीला प्रश्न पडत असतील तर हे बुद्धिमान असण्याचे सर्वसामान्य लक्षण आहे. पण जर का हे प्रश्न असामान्य असतील तर मात्र ते बुद्धिमान असल्याचे लक्षण आहे.
हुशार माणसाला पडलेले प्रश्न हे त्याला त्याचे उत्तर मिळाल्याशिवाय शांत बसू देत नाहीत. त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
माहिती मिळवण्याची भूख असणे :
जर तुम्हाला माहिती मिळवणे व त्या माहितीचे संकलन करणे किंवा इंटरनेट वर माहिती देणारे विडिओ पाहणे, ऑडिओ व लेख आवडत असतील तर हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे.
कारण बुद्धिमान व्यक्तीला मनोरंजनापेक्षा नॉलेज मिळवण्याची जास्त आवड असते. त्यांना हे माहिती असते की, जर का जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नॉलेज आत्मसात करणे महत्वाचं आहे.
रात्री जागरण :
एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण होईपर्यंत अशा लोकांना चैन पडत नाही. मग त्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागले तरी त्यांना त्याची पर्वा नसते. जर आजूबाजूला जास्त दंगा असेल तर बुद्धिमान लोकांच लक्ष लवकर भटकतं म्हणून ते त्यांचे महत्वाचे काम शांत वातावरणात करतात.
अशी शांत वेळ संध्याकाळ नंतर मिळते जी दिवसा भेटत नाही म्हणून हे लोक रात्री उशिरापर्यंत जगात बसतात व आपले काम पूर्ण करतात.
स्वतःशी बोलणे किंवा गुफ्तगू करणे :
ज्या व्यक्ती हुशार असतात त्या एखादी गोष्ट स्वतःला स्वतःच समजावून सांगत असतात. शास्त्रज्ञांच्या मते हे एक बुद्धिमान असण्याचं लक्षण आहे.
जेव्हा अशी लोकं टेन्शनमध्ये असतात तेव्हा स्वतःलाच बोलून आयडिया देत असतात ज्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते तसेच 'सायकॉलॉजिकल मोटिव्हीशन' ही मिळते.
विसरभोळा स्वभाव :
विसरणं हे एक हुशार लोकांचे लक्षण आहे. तुम्हीही छोट्या-छोट्या गोष्टी विसरून जात असाल आणि विचार करताना तुमचं भान हरपून जात असेल तर हे बुद्धिमत्तेचे लक्षण समजावे.
कारण बुद्धिमान व्यक्तीचा मेंदू गुंतागुंतीच्या विचारांमध्ये मग्न असतो, तो स्वतःच्या वर्तमान काळातील कार्यांचा विचार करण्यात गुंग असतो म्हणूनच सहजा सहजी छोट्या-मोठ्या गोष्टी विसरून जातो.
कमी लोकांत राहणं :
अशी लोकं शक्यतो अबोल असतात, समाजाच्या गर्दीत आणि खूपच रहदारी असलेल्या ठिकाणी राहायला अशा लोकांना आवडत नाही. या लोकांचे मित्र पण खूप कमी असतात, यांना जास्त माणसांशी बोलायलाही आवडत नाही आणि ही एक बुद्धिमान व्यक्तीची निशाणी आहे.
असे असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या विचारांशी मिळते-जुळते विचार असलेले लोक त्यांना भेटत नाहीत म्हणून त्यांचे फ्रेंड सर्कल मर्यादित असते. इंटेलिजेंट लोकांच्या आवडी-निवडी व गरजा या सामान्य माणसांपेक्षा अगदी वेगळया असतात म्हणून ते कमी लोकांत राहने पसंत करतात.
पसाऱ्यामध्ये राहणे :
बुद्धिमान व्यक्तींच्या रूममध्ये कपड्यांचा व टेबलवर साहित्यांचा नेहमी गोंधळ माजलेला असतो. यांच्या रूम मधील सामान इकडे तिकडे पडलेले असते. टेबलवर गोंधळ असण हे व्यक्तीची क्रीएटीव्हीटी वाढवते तसेच नवीन काम करण्याची उमंग येते.
झोपताना विचार करणं :
बुद्धिमान माणसे झोपण्या अगोदर दिवसभर केलेल्या कार्याची गोळाबेरीज करतात. दिवसभरात किती काम झाले अन किती नाही या गोष्टींची सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणती आहे यावर विचार-विमर्श करत झोपी जातात.
🙋🙆🙈🙉🙊🙌🙏
याचबरोबर इंटेलिजेंट मनुष्यांची काही ठळक वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील -
🌺 या लोकांना कधीही कोणत्या गोष्टीचा त्रास करून घेणे, वादविवाद करणे हे आवडत नाही. त्यांच्याविरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना कसलाच रस नसतो.
🌺 मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी समोरच्या माणसाला तुझंच बरोबर आहे आणि माझेच चुकले असे बोलून ते भांडणाचा विषय जितक्या होईल तितक्या लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात.
🌺 रागात असताना कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कोणताही निर्णय पट्कन देत नाहीत. इतर लोकांच्या मतांशी यांना काहीही देणे घेणे नसते. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण यांच्या स्वभावाशी अगदी तंतोतंत जुळते.
🌺 स्वता:ही हसतात आणि दुसऱ्यानाही हसवतात. यांच्या चेहर्यावर नेहमी शांतता असते, हसमुख स्वभावाचे असतात.
🌺 'मी खूप हुशार आहे' असा बडेजाव हे लोक करत बसत नाहीत.
🌺 या व्यक्तींच्या जवळ मोहावर ताबा ठेवण्याची अफाट शक्ती असते.
🌺 बुद्धिमान, हुशार व्यक्तिना निरोगी राहायला आवडते व ते त्यासाठी निश्चयी असतात. अश्या व्यक्ती व्यसने करत नाहीत व ते आपल्या आहाराला खूप महत्व देतात.
🌺 आपण बुद्धिमान मनुष्य त्याला म्हणू शकतो, जो अति हुशार व अर्धवट माणसांना सांभाळून घेऊन पुढे चालत असतो.
🌺 चुका करणे शक्यतो टाळतात आणि चुकून जरी चुक झालीच तर ती लगेच मान्यही करतात.
🌺 आपल्या साथीदाराला सुद्धा हे लोक सर्व गुपिते उघडपणे सांगत नाहीत. जी गोष्ट कामाची आहे तेवढीच सांगतात.
🌺 यांना एकटे वेळ घालवायला खूपच आवडते याउलट बुद्धिमान लोकांसोबत वेळ घालवायलाही आवडतो. आपल्या लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमी पाठिंबा देतात.
🌺 या प्रकारच्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर सहसा डोळे झाकून विश्वास ठेवत नाहीत त्याची पूर्णपणे चौकशी करतात. आपल्या आयुष्यात सहजा-सहजी कुणालाही स्थान देत नाहीत आणि विश्वासू माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात.
🌺 बुध्दिमान व्यक्तींची मैत्री अगदी बोटावर मोजता येईल इतक्याच लोकांबरोबर असते. त्यांचे मोजकेच मित्र-मैत्रीण असतात.
🌺 समोरच्या व्यक्तीशी बोलताना नजरेला नजर भिडवून बोलतात. त्यांना बोलणाऱ्याच्या डोक्यात कोणते विचार चालू आहेत हे जाणून घ्यायचे असते.
🌺 बुद्धिमान व्यक्ती ह्या उच्चकोटीच्या श्रोता असतात व त्यांना जी गोष्ट आवडते त्या विषयाबद्दल ते मन लावून ऐकतात.
🌺 अशी माणसं कमी बोलतात, बोलण्यागोदर विचार करतात, उगीचच बडबड करणे, वारंवार एकाच विषयावर बोलणे, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे त्यांना अजिबात आवडत नाही.
🌺 नेहमी वाचन करत असतात, वाचन करणे हा त्यांचा एक छंदच असतो, त्यांना वाचनाची खूप आवड असते. एखादा आवडीचा विषय त्यांच्या हाती वाचायला सापडला तर तो पूर्णपणे वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.
🌺 आयुष्यात जोखीम पत्करण्यास हे लोक नेहमी तत्पर असतात.
🌺 बचत करून राहिलेली रक्कम खर्च करतात, ज्या वस्तूंची गरज नाही अशा वस्तूवर वायपट खर्च करत नाहीत.
तसं पाहायला गेलं तर ही सर्व सुखी माणसाचीही लक्षणं आहेत परंतु खासकरून मला तरी असं वाटतं की, सुखी माणूस आणि बुद्धिमान माणूस यात फरक तो काय? "जो सुखी आहे तो बुद्धिमान असतोच असतो आणि जो बुद्धिवान आहे तो सुखी असतोच."
What Are The Symptoms Of An Intelligent Person?
1 Comments
खूप छान
ReplyDelete