गोडी मधाची Godi Madhachi (Sapan Bhurr Zal) Song Lyrics | Onkarswaroop, Anwesha | Baban

गोडी मधाची Godi Madhachi Sapan Bhurr Zal Song Lyrics Onkarswaroop Anwesha Baban गोडी मधाची चाखली मिटले नयन सरला उजेड घेतली कवेत लाडकी माझी सुगरण
गोडी मधाची Godi Madhachi (Sapan Bhurr Zal) Song Lyrics | Onkarswaroop, Anwesha | Baban


मराठी चित्रपट "बबन" मधील "गोडी मधाची (सपान भुर्र झालं)" हे गाणं खूपच लोकप्रीय झाले. सपान भुर्र झालं हे गाणं ओंकारस्वरूप आणि अन्वेषा यांनी अतिशय सुंदर गायले आहे आणि ओंकारस्वरूप यांनी संगीत बद्ध केले आहे. सुहास मुंडे यांनी या सुंदर गीताचे बोल लिहिले आहेत.

गोडी मधाची (सपान भुर्र झालं) गाण्याचे बोल


गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड

घेतली कवेत लाडकी 
माझी सुगरण~  माझी सुगरण~

तिला सजवील तिला भिजवील 
रान फुलाची आरास दिलिया आंदन~~

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

भाळी कुकाच गोंदण 
मिटलं व्हटान फुलला मोहोर 

घातली सजनानी साद ही 
माझी सुगरण~ माझी सुगरण~

मला लाजवील मला भिजवील 
रान फुलाची आरास आलया चांदण 

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

रूतलया अंग झालीय दंग 
फिरली नजर खुल्या रानात

आभाळाने छत हे धरलया मिठीत 
झाकलया यौवन पाण्यात

दिलाया सबुत बांधीन खोपा
झाडाला झोका धीरा धीरानं चढवीन 

रूप नवाळ न्हाऊन
तुला आभाळी फिरवीन 

तिला सजवील तिला भिजवील 
रान फुलाची आरास दिलिया आंदन 

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

सपान भुर्र झालं लाजून चुर्र झालं
रातीचा दिस केला दिसात न्हाली रात

गोडी मधाची चाखली
मिटले नयन सरला उजेड

घेतली कवेत लाडकी 
माझी सुगरण~  माझी सुगरण~

♪ गाणे : गोडी मधाची (सपान भुर्र झालं)
♪ गायक : ओंकारस्वरूप, अन्वेषा दत्ता गुप्ता 
♪ गीत: सुहास मुंडे
♪ संगीतकार : ओंकारस्वरूप
♪ चित्रपट : बबन
♪ Godi Madhachi (Sapan Bhurr Zala) Song Lyrics In Marathi

Post a Comment

0 Comments