जगण्याला पंख फुटले Jagnyala Pankh Futle Lyrics | Onkarswaroop, Anweshaa | Movie Baban |
मराठी चित्रपट "बबन" मधील "जगण्याला पंख फुटले" गीत. ओंकारस्वरूप आणि अन्वेषा यांनी अगदी सुंदर गायले आणि हर्षित अभिराज यांनी संगीत बद्ध केले आहे. डॉ. विनायक पवार यांनी या सुंदर गीताचे बोल लिहिले आहेत.
जगण्याला पंख फुटले गाण्याचे बोल मराठी
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले~~~
ए माझ्या… जगण्याला पंख फुटले
रान सारं गाणं झालं
मेणावानी मनं झालं
रान सारं गाणं झालं
मेणावानी मनं झालं
जगण्याला पंख फुटले~~~
हे माझ्या… जगण्याला पंख फुटले
हे फुलासंग नाचताना रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली~~~
पैजणांच वाजणं हे जीव घेई लाजणं हे
पापण्यांची फुलं नाचली~~~
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
ए माझ्या… जगण्याला पंख फुटले
अंग अंग खेटताना, आभाळ हे पेटताना
गजर्याला लाज वाटली~~~
झुळ झुळीचे सुर झाले
हातांचेच हार झाले
ओठांची ही कुपी भेटली ~~~
देह तडीपार झाला, ढगावरी स्वार झाला
जगण्याला पंख फुटले~~~
हे माझ्या… जगण्याला पंख फुटले
♪ गाणे: 'जगण्याला पंख फुटल' गीत
♪ गायक: ओंकारस्वरूप, अन्वेषा
♪ गीतकार: विनायक पवार
♪ संगीतकार: हर्षित अभिराज
♪ चित्रपट: बबन
♪ Jagnyala Pankh Futle Lyrics In Marathi
More Lyrics Of Movie Baban
0 Comments