साज ह्यो तुझा Saaj Hyo Tuza Lyrics | Onkarswaroop | Baban

साज  ह्यो तुझा गाण्याचे बोल मराठी Saaj Hyo Tuza Lyrics Suhas Munde, Onkarswaroop Baban  साज  ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं उशाखाली फोटो तुझा चांदरातीला
साज  ह्यो तुझा Saaj Hyo Tuza Lyrics | Onkarswaroop | Baban


मराठी चित्रपट "बबन" मधील "साज ह्यो तुझा गीत". ओंकारस्वरूप यांनी अगदी सुंदर गायले आणि संगीत दिले. सुहास मुंडे यांनी या सुंदर गीताचे बोल लिहिले आहेत. 

साज  ह्यो तुझा गाण्याचे बोल मराठी


साज  ह्यो तुझा 
जीव माझा गुंतला गं

उशाखाली फोटो तुझा
चांदरातीला 

तुझ्या वेणीतलं फुल 
माळून विसावलं मन 

त्या विसावल्या मनालाही
घेना साथीला गं

मृगनयनी या हाक दे मला 
रोज मी उभा त्या वाटला 

फुल झालो मी 
गंध हो ना तु 

सांजयेळच माझं
गाणं हो ना तु 

तुझ्या सावलीत आज गं
निजलोय गार गं

झेलतोय रोजचा 
त्या उन्हाला गं

आभाळ फिरून येईल 
ढग दाटून येतील गं

मनातल्या हुंद्क्याचा 
डोळ भरल्या पाण्याचा 

रंग कोणता ह्यो
सांग मातीला गं

साज  ह्यो तुझा 
जीव माझा गुंतला गं

उशाखाली फोटो तुझा
चांदरातीला 

तुझ्या वेणीतलं फुल 
माळून विसावलं मन 

त्या विसावल्या मनालाही
घेना साथीला गं

♪ गाणे : 'साज ह्यो तुझा' गीत
♪ गायक : ओंकारस्वरूप
♪ गीतकार : सुहास मुंडे
♪ संगीतकार : ओंकारस्वरूप
♪ चित्रपट : बबन
♪ Saaj Hyo Tuza Song Lyrics In Marathi

More Lyrics Of Movie Baban

Post a Comment

0 Comments