हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाणारे साडे तीन मुहूर्त

हिंदू संस्कृतीमधे साडे तीन मुहूर्ताला 'स्वयं सिद्ध मुहूर्त' असे संबोधले गेले आहे. असे 'स्वयं सिद्ध मुहूर्त' आपल्या हिंदू संस्कृतीमधे साडे तीन असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. ते खालीलप्रमाणे आहेत:


तीन पूर्ण मुहूर्त :

१) गुढीपाडवा

२) अक्षयतृतीया, आणि

३) विजयादशमी

४) बलिप्रतिपदा (अर्धा मुहूर्त)


वरील तीन हे पूर्ण मुहूर्त आणि चौथा दिवाळीतील कार्तिक शुद्ध प्रतिपदा - बलिप्रतिपदा (दिवाळीचा पाडवा) हा अर्धा मुहूर्त मानला गेला आहे.

हिंदू संस्कृती मधील पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करण्यात येतो. हे साडेतीन मुहूर्त पूर्णपने शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास चांगला मुहूर्त, वेळ-काळ बघण्याची गरज नसते.



Post a Comment

0 Comments