महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठे कोणती?

नवरात्रोत्सव म्हटलं की महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचा पहिला मान. नवरात्रोत्सव आला की भावीक आपोआपच आदिशक्तीच्या या पीठांकडे वळायला लागतात. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवींची साडेतीन पीठं आहेत. आदिशक्तीची ही सर्वच स्थळे जागृत देवस्थान मानली जातात. म्हणूनच इथे नवरात्रोत्सवात भाविकांची जास्त गर्दी बघायला मिळते. Maharshtratil Purn Shakti Peeth Konti?


महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे ही खुप प्रसिद्ध व पूजनीय आहेत. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते. ही साडेतीन शक्तिपीठे म्हणजे साक्षात् ॐ काराचे सगुण रूप आहेत. ॐ कारामध्ये साडेतीन मात्रा येतात व ही देवींची शक्तिपीठे ही त्याचेच साक्षात रूप मानले जाते. Adishakti chi Sadetin Shakti Peeth in Marathi. 


आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे :

  • १) 'अ' कार शक्तिपीठ म्हणजे रेणुकादेवी – माहूर (पूर्ण पीठ)
  • २) 'उ' कार शक्तिपीठ म्हणजे तुळजाभवानी-तुळजापूर (पूर्ण पीठ)
  • ३) 'म' कार शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) - कोल्हापूर (पूर्ण पीठ)
  • ४) अर्धमात्रा शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी (अर्ध पीठ)  (साडेतीन मधील अर्धे)

(Sadetin Shakti Peeth Name List)

१) 'अ' कार शक्तिपीठ म्हणजे रेणुकादेवी – माहूर (पूर्ण पीठ)


महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे कोणती? आदिशक्तीची शक्तिपीठे ही खुप प्रसिद्ध व पूजनीय आहेत ही शक्तिपीठे म्हणजे साक्षात ॐ काराचे सगुण रूप आहेत sadetin shakti peeth images
'अ' कार शक्तिपीठ म्हणजे रेणुकादेवी – माहूर (पूर्ण पीठ)


माहूर (माहूरगड) हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता 'रेणुकादेवी' आहे. देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय.


श्री रेणुकामातेला 'यल्लम्मा देवी' म्हणूनही ओळखले जाते. रेणुका आणि येल्लम्मा ही दोन्ही एकाच देवीची दोन नावे आहेत. यल्लम्मा देवी हे काली देवीचे रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त ठेवणारा आहे. Renuka Devi Mahur Gad


२) 'उ' कार शक्तिपीठ म्हणजे तुळजाभवानी-तुळजापूर (पूर्ण पीठ)


महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे कोणती? आदिशक्तीची शक्तिपीठे ही खुप प्रसिद्ध व पूजनीय आहेत ही शक्तिपीठे म्हणजे साक्षात ॐ काराचे सगुण रूप आहेत sadetin shakti peeth images
'उ' कार शक्तिपीठ म्हणजे तुळजाभवानी-तुळजापूर (पूर्ण पीठ)


महाराष्ट्रातील आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. तुळजापूर हे साडेतीन मधील महत्वाचे तीर्थक्षेत्र, शक्तिपीठ असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे (Aai Tulja Bhavani) प्राचीन मंदिर आहे. हे तुळजाभवानीचे शक्तीपीठ महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले आहे. तुळजाभवानी देवीची खूप महती सांगितली जाते. महाराष्ट्रात तुळजाभवानीला विशेष महत्त्व असून नवरात्र उत्सव इतर ठिकाणी नऊ दिवसांचा असतो पण तुळजापूरला मात्र हा उत्सव एकवीस दिवसांचा असतो.


हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते तसेच त्यांच्या तलवारीचे नाव सुद्धा 'भवानी' असे होते. श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला "भवानी तलवार" म्हणून ओळखले जाते. "भवानी तलवार" ही श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेने दिली असेही सांगितले जाते. तुळजापूरची "तुळजाभवानी" ही भोसले घराण्याची कुलदेवता (कुळदैवत) आहे. Aai Tulja Bhavani, Tuljapur.


तुळजाभवानी आईचा वरदहस्त राजे शिवजी महाराजांच्या डोक्यावर होता व हातात भवानी तलवार दिली होती यातूनच माता तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. भवानी मातेने शिवजी महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन स्वराज्य - महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी "भवानी तलवार' दिली अशी आख्यायिका आहे.


३) 'म' कार शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) - कोल्हापूर (पूर्ण पीठ)

Shri Karvir Nivasini Mahalaxmi Ambabai, Kolhapur

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे कोणती? आदिशक्तीची शक्तिपीठे ही खुप प्रसिद्ध व पूजनीय आहेत ही शक्तिपीठे म्हणजे साक्षात ॐ काराचे सगुण रूप आहेत sadetin shakti peeth images
'म' कार शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) - कोल्हापूर (पूर्ण पीठ)


कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर (अंबाबाई) हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठांपैकी "म" कार शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईला अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असेही म्हटले जाते.


श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही विष्णूची भार्या आहे आणि म्हणूनच गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे असे म्हटले जाते.


४) अर्धमात्रा शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी (अर्ध पीठ) (साडेतीन मधील अर्धे)

Saptashrungi Mata Mandir Saptshrung.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे कोणती? आदिशक्तीची शक्तिपीठे ही खुप प्रसिद्ध व पूजनीय आहेत ही शक्तिपीठे म्हणजे साक्षात ॐ काराचे सगुण रूप आहेत sadetin shakti peeth images
अर्धमात्रा शक्तिपीठ म्हणजे सप्तशृंगी (अर्ध पीठ) (साडेतीन मधील अर्धे)


सप्तश्रुंग निवासिनी 'सप्तशृंगी' देवीच्या मूळ गर्भगृहाचे दर्शन सहजासहजी होत नाही म्हणून या पीठाला 'अर्धपीठ' म्हणून ओळखले जाते. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच आहे. श्री सप्तश्रृंग देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली आहे. देवीच्या मुर्तीला दोन्ही बाजुस ९-९ असे एकुण १८ हात व त्यात विविध आयुधे आहेत.


महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ ("अर्धपीठ" ‘’अर्ध शक्तीपीठ’’) असलेली सप्तशृंगीदेवी नाशिक पासुन ६० किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित सप्तशृंग गडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. ‘’सप्तश्रृंग’’ या शब्दाचा अर्थ ‘’सात शिखरे’’ असा होतो. Saptashrungi Mata, Nashik.

Post a Comment

0 Comments