वाजले की बारा Wajle Ki Bara Lyrics | Natarang | Amruta Khanvilkar, Ajay-Atul

वाजले की बारा Wajle Ki Bara Lyrics | Natarang | Amruta Khanvilkar, Ajay-Atul
वाजले की बारा Wajle Ki Bara Lyrics | Natarang | Amruta Khanvilkar, Ajay-Atul

वाजले की बारा गाण्याचे बोल मराठी

चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धड-धड काळजात माझ्या माईना

कदी कवा कुठं कसा
जीव झाला येडा-पीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना

राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटू कवातरी साजणा~~~~

मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा

हे कशा पाई छळता
मागं मागं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी

सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली

हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा~~~~  जी जी रं जी


ऐन्यावानी रुप माझं उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात
नादावलं खुळंपीसं कबुतर हे माज्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची

हे नारी गं, राणी गं
हाय नाजर उब्या गावची

हे शेत आलं राखणीला, राघु झालं गोळा
शीळ घाली आडुन कोनी, करून तिरपा डोळा

आता कसं किती झाकू, सांग कुटंवर राखू
राया भान माझं मला ऱ्हाईना~~~

मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
अहो जाऊ द्या ना घरी

हे कशा पाई छळता
मागं मागं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी

हे सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली

हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा~~~ जी जी रं जी 

हो, आला पाड, झाला भार
भरली उभारी घाटा घाटात
तंग चोळी, अंग जाळी
टच्च डाळींब फुटं व्हटात

गार वारं, झोबणारं
द्वाड पदर जागी ठरना
आडोश्याच्या, खोडीचं मी
कसं गुपित राखू कळंना

हे, नारी गं, राणी गं
कसं गुपित राखू कळंना

हे, मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा
जीवा लागलिया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताची ही तुझी ऱ्हाऊ द्या~~~~

मला जाऊ द्या ना
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना
आता वाजले की बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा
अहो जाऊ द्या ना घरी~~~

हे कशा पाई छळता
मागं मगं फिरता
असं काय करता दाजी
हिला भेटा की येत्या बाजारी

हे सहाची बि गाडी गेली
नवाची बि गेली
आता बाराची गाडी निघाली

हिला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले की बारा~~~ जी जी रं जी

🎵गाणे: वाजले की बारा - अमृता खानविलकर
🎵गायक: बेला शेंडे आणि कोरस
🎵गीतकार: गुरु ठाकूर
🎵संगीतकार: अजय-अतुल (Ajay-Atul)
🎵संगीत लेबल: झी मुझिक कंपनी
🎵चित्रपट: नटरंग (2010)
🎵कलाकार: अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, किशोर काडा, विभवारी देशपांडे, प्रिया बेर्डे, अमृता खानविलकर
🎵Wajle Ki Bara Lavani Song Lyrics In Marathi

Post a Comment

0 Comments