गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा! मराठी Guru Purnima Wishes In Marathi

गुरु पौर्णिमा उत्सव हा गुरु, ज्ञान आणि शहाणपणाची अफाट संपत्ती आपल्याला मुक्तकंठाने दान करणार्‍या गुरुंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

गुरु पौर्णिमा हा भारत आणि नेपाळ मधील हिंदू, बौद्ध आणि जैन यांच्या द्वारा साजरा करण्यात येणारा लोकप्रिय उत्सव आहे. या दिवशी शिष्य किंवा विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे त्यांचे जीवन यशस्वी बनवण्यासाठी जी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली त्याबद्दल कृतज्ञता आणि सहानुभूती व्यक्त करतात. गुरु पूर्णिमा हा गुरूच्या रूपात आणि सन्मानार्थ आहे.

दर वर्षी हिंदू पुराणानुसार, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूंचे गुरु व्यास मुनी यांच्या जयंती निमित्त गुरु पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) असेही संबोदले जाते.

केवळ शाळेत शिकवणारे शिक्षकच गुरु आहेत असे नाही तर आपली आई आणि बाबा हे आपले सर्वात पहिले गुरु असतात. या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानता यावेत यासाठीच हा दिवस गुरु पौर्णिमा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.

यानिमित्त सोशल मीडियावरून तुमच्या WhatsApp Status, Facebook Status व Instagram Status वर गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Grur Purnima Wishes शेअर करण्यासाठी काही खास गुरु पौर्णिमा sms देत आहोत. आणि विशेष म्हणजे तुम्हा सर्वाना गुरु पौर्णिमा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! Guru Purnima Messages in Marathi.

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जय गुरुदेव..!


गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी Guru Purnima Wishes In Marathi गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा! मराठी Guru Purnima Wishes In Marathi

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा...
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य...
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य...
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक...
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!



आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यांमुळे मला
लढायला लावणारी प्रेरणा तुम्हीच आहात.
मी जो काही आहे ते तुमच्याशिवाय
शक्य झाले नसते. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!



जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन...
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा...
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!



आज गुरुपौर्णिमा... ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं,
लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…
असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.
मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो...
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना
माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!



आदी गुरुसी वंदावे, मग साधनं साधावे;
गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पाप;
गुरु म्हणजे आहे काशी, साती तिर्थ तया पाशी;
तुका म्हणे ऐंसे गुरु, चरणं त्याचे ह्रदयीं धरू.



माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा,
माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले
तसेच माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला
वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे
माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, समाजातील
न्यात-अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला
वंदनीय व गुरुतुल्य आहात…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा
सर्वांना वंदन व शुभेच्छा… जय गुरुदेव दत्त!



जर शिष्यला गुरु वर पूर्ण विश्वास असेल
तर गुरुसुद्धा त्याचे कही वाईट करू शकत नाही!
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!



देशवासियों को गुरु पूर्णिमा की ढेरों शुभकामनाएं।
जीवन को सार्थक बनाने वाले गुरुओं के प्रति
सम्मान प्रकट करने का आज विशेष दिन है।
इस अवसर पर सभी गुरुजनों को मेरा सादर नमन। - नरेंद्र मोदी



ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई हे निस्वार्थ दान
गुरु त्यासी मानावा
देव तेथेची जाणावा
गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!



गुरू शिवाय ज्ञान नाही,
ज्ञानाशिवाय आत्मा नाही;
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
ही सर्व गुरुचीच देणगी आहे.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!



सर तुमची कमी मला आज भासत आहे
कारण तुमच्यामुळेच मी घडलो आहे
तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे
मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!



तुमच्याकडून शिकलो आणि जानले,
तुम्हालाच गुरु मानले,
तुमच्याकडून सर्व काही शिकलो,
लेखणीचा अर्थ पण तुमच्याकडूनच जाणून घेतला,
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!



आपण आता ज्या मार्गावर आहात त्यावर टिकून रहा,
आपल्या गुरूने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करा,
यश तुमच्याकडे येईल...
आपण आपल्या जीवनाचा तारा व्हाल...
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!



शिक्षक पण शिकवतात अन वेळ देखील शिकवते!
पण दोघांमध्ये फरक एवढाच आहे की,...
शिक्षक शिकवणी नंतर परीक्षा घेतो
आणि वेळ परीक्षा घेऊन शिकवते!
गुरुपौर्णिमेच्या खुप-खुप शुभेच्छा!



आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार - सर्वाना सुखदा पावे...
अशी आरोग्य, संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
गुरु पौर्णिमेच्या शुभकामना!



गुरु सर्वात महान आणि श्रेष्ठ असतो;
जो सर्वांना ज्ञान भंडार देतो,
या गुरु पौर्णिमेच्या दिवशी
आपल्या गुरुला अभिवादन करूया.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!



आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर
काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या
सर्व गुरूंना धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



नातं खूप घनिष्ठ असो वा नसों परंतु
विश्वास खूप घनिष्ठ असणे आवश्यक आहे.
सर्वोत्कृष्ट गुरु तोच असतो ज्याच्या प्रेरणेने
एखाद्याचे चित्र-चरित्र बदलते आणि...
सर्वोत्कृष्ट मित्र हा तोच असतो ज्याच्या
संगतीमध्ये जीवनाचे रंग बदलतात.
गुरुपौर्णिमेच्या खुप-खुप शुभेच्छा!



गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान...
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया...
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना...
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा...
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तया पाशी
तुका म्हणा ऐंसे गुरु, चरण त्याचे हृदयी धरू
गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!



आपण आम्हाला बोट धरून चालायला शिकविले;
पडल्यानंतर कसे उभे राहायचे हे सांगितले;
तुमच्यामुळेच आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो आहोत;
गुरु पौर्णिमेच्या दिवशी आम्ही कृतज्ञतेने वंदन करतो.
गुरु पौर्णिमेच्या शुभकामना!



आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||
गुरु म्हणजे माय-बाप | नाम घेता हरतील पाप||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरण त्याचे ह्रदयीं धरू||
गुरूपोर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा!



शांततेचा धडा शिकवला,
अज्ञानाचा अंधकार मिटविला,
गुरुने आपल्याला शिकवले...
प्रेम हे द्वेषावर विजयी आहे.
आपणास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

3 Comments