Happy Birthday Messages In Marathi वाढदिवस सुविचार मराठी शुभचिंतन मेसेजेस

आपल्या प्रियजणांना त्यांच्या वाढदिवशी एखादा छानसा हैप्पी बर्थडे मेसेज पाठवावा असे आपल्याला नेहमी वाटत असते, परंतु ऐन वेळी शब्द सुचत नाहीत अन मग मोबाईल मध्ये एकच शोधा-शोध सुरु होते. मोबाईल मध्ये नाही सापडले तर मग google बाबा आहेच... तुमच्या आवडत्या खास मित्रासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, आपल्या गुरु साठी, टीचर साठी असे भावनिक व मोटिवेशनल शुभेच्छा मेसेज पाठवायला तुम्हाला फार आवडेल. म्हणूनच आम्ही आपल्या सोयीसाठी येथे असेच काही मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा! मेसेज संग्रहित केले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील . शुभचिंतन मेसेजेस. 

Happy Birthday Status In Marathi For Your Loved One

मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes In Marathi


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या 
नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. 
तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे … 
मनात आमच्या एकच आहे इच्छा 
तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

✿✿✿

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र 
असतात त्यापैकी तू एक आहेस भावा ... 
अशा जिवाभावाच्या मित्राला 
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…

✿✿✿

आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं मन, 
तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं...
आणि आनंदाचा बहर तुमच्या जीवनात नित्याने येत राहो... 
ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा... 

✿✿✿

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी 
माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 

✿✿✿

ज्याशिवाय मी आयुष्याची कल्पनाही करू शकत 
नाही अशा व्यक्तीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आपण  खूप प्रेमळ आहात! मनमिळावू आहात, 
आणि आज आपल्या खास दिवसाचा आनंद घ्या.

✿✿✿

Birthday Wishes For Brother In Marathi
आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच
प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. 
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल 
आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य 
अधिकाधिक सुंदर बनावं… वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा!!!

✿✿✿

Happy Birthday Messages In Marathi मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes For Best Friend In Marathi वाढदिवस सुविचार मराठी
Happy Birthday Messages In Marathi 

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील,
काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील ,
तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….
आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

✿✿✿

वाढदिवस तर दरवर्षी येतात, 
परंतु आपल्यासारखे मित्र 
आयुष्यात एकदाच येतात. 
आपण माझ्या आयुष्यात आला 
याचा मला आनंद आहे.
खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

✿✿✿


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी….
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे….
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे….
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

✿✿✿

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे...
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे...

✿✿✿

"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली
किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार 
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” 
आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!

✿✿✿

तुमची #प्रगती, तुमची #बुद्धी,
तुमचे #यश, तमची #किर्ती...!
#वृद्धिंगत होत जावो🌹
#सुख समृद्धीची बहार तुमच्या
#आयुष्यात कायम येत राहो..😊
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!🎂
🍫🎂🍫🌹🌺🌺 my sweet bro

✿✿✿

Birthday Wishes For Best Friend In Marathi
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून 
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

✿✿✿

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत 
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

✿✿✿

तुझ्या दिलदार मैत्रीबद्दल 
मी कृतज्ञ आहे... 
आशा आहे की तुझा 
वाढदिवस अद्भुत  बनेल.
माझ्या सर्वोत्तम मित्राला 
अनेक शुभेच्छा!!!

✿✿✿

नवे क्षितीज नवी पाहट , 
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!!!

✿✿✿

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!!

✿✿✿

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत रहावी ,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.

✿✿✿

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!!

✿✿✿

वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,
एक नवीन सुरूवात आहे आणि
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा
पाठपुरावा करण्याची वेळ आहे.
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.
आज अन  तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असतील!!!

✿✿✿

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना... 

✿✿✿

तुम्हाला माहित आहे का ? 
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे ...!!!
शेवटी, खास दिवस आज आला,
चला आजचा तुमचा खास
दिवस अजून खास बनवूया…
वाढदिवसाच्या गोड-गोड शुभेच्छा!!!
✿✿✿

तुम्हाला तुमच्या आयुष्यात
खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या 
कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या
जीवनात दरवळत राहो…
हीच देवाकडे प्रार्थना आहे!
वाढदिवसाच्या तुम्हाला 
खूप साऱ्या शुभेच्छा!!!

✿✿✿

आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात 
असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय
प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

✿✿✿

आज आपण आपल्या आयुष्यातील 
नवीन वर्ष सुरू करणार आहात…
देव तुम्हाला आनंद...  समृद्धी...
समाधान... दीर्घकाळ... आरोग्य देवो,
आशा आहे की तुमचा खास दिवस 
तुमच्या आयुष्यात बरेच 
सुखमय क्षण घेऊन येईल!!!
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

आज तुमचा वाढदिवस आहे,
आणि आजच्या खास दिवशी,
ज्याची कल्पना तुम्ही कधी 
केली नाही असं काहीतरी 
तुम्हला प्राप्त होवो,
मी स्वतःला भाग्यवान समजतो 
कारण तुमच्या सारखे लोक 
माझ्या जीवनात आहेत,
!!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख 
तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ मोठं ह्रदय व्हावं,
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावा,
तुमचा प्रत्येक क्षण सुखमय असावा,
तुम्ही इतके यशस्वी व्हा कि
सर्व जग तुम्हाला सलाम करेल.
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात 
करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होवो,
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

✿✿✿

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या 
आयुष्यात भरभरून यश 
आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे 
कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, 
आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !!
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्वल रहा,
तुमचं आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,
प्रत्येक झेप ही आकाशाला 
गवसणी घालणारी असावी ... 
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!

✿✿✿

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा 
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. 
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी 
भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे... 
नेहमी पुढेच - पुढे जात रहा ...
वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!!!

✿✿✿

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✿✿✿

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .
परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✿✿✿

आज तुमचा वाढदिवस आहे,
आपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावी…
आजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✿✿✿

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो,
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा...
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा...
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार 
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो...
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

माझी अशी इच्छा आहे की, 
जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल 
तेव्हा संपूर्ण जग तुमचा 
वाढदिवस साजरा करेल...
आज तुम्हाला या खास 
प्रसंगी सर्व आनंद मिळतील…

✿✿✿

तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी
होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा 
माझे जीवन अधिक आनंदी झाले...
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात 
आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. 
!!! वाढदिवसाच्या खूप - खूप हार्दिक शुभेच्छा !!!

✿✿✿

चांगले मित्र येतील आणि जातील, 
पण तुम्ही नक्कीच माझे खास 
आणि जिवाभावाचे सोबती असाल. 
मला तुझ्यापेक्षा चांगले 
कोणीही समजत नाही, 
मी खूप नशीबवान आहे कारण 
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत...

✿✿✿

आजचा दिवस आहे खास,
तुम्हाला उदंड, सुखमय आणि 
निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास
!!! वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !!!

✿✿✿

Post a Comment

0 Comments