मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपडेट :
१६.०८.२०२४
- ज्या लाडक्या बहिणींनी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे त्यांचा सप्टेंबर मध्ये ४५०० रुपये हप्ता जमा होणार.
- योजनेचा दुसरा हप्ता १५०० रुपये सप्टेंबर मध्ये मिळणार.
- योजनेचा पहिला हप्ता ३००० रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मध्य प्रदेश मधील 'लाडली बहना' ही योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे याच योजनेची नकल महाराष्ट्र सरकारही करताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” ही योजना राबविण्याचे जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये कमी उत्पन्न गटातील विविध क्षेत्रांतील महिलांची नावनोंदणी करण्यासाठी पात्र लाडक्या बहिणींकडून अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने भरून घेतले जात आहेत.
ladki bahin yojana, ladki bahin yojana update, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2024 online apply, लाडकी बहीण योजना हमीपत्र, ladki bahin yojana online apply
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - सरकारकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलाबाबत माहिती खाली अद्ययावत करत आहे.
➤ अर्ज करण्यासाठी मुदतवाढ : लाभ
'महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिन योजने'साठी अर्ज करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट 2024 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील सर्व पात्र महिला या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (नारीशक्ती दूत ऍप) सादर करू शकतात. ही अंतिम मुदत पूर्ण करणाऱ्या अर्जदारांना १ जुलै २०२४ पासून ₹१५०० रुपये मासिक भत्ता मिळण्यास सुरुवात होईल. हा मासिक भत्ता ऑनलाईन डी. बी. टी. (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) च्या माध्यमातून लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.
➤ रहिवासी प्रमाणपत्र बाबत अटींमध्ये शिथिलता :
लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हा या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास / रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, परंतु आता सरकारने याबाबत निर्णयामध्ये बदल केला आहे. आता लाभार्थी महिलेकडे रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे इतर वैध कागदपत्रे स्वीकारली जाऊ शकतात - 1) रेशन कार्ड 2) मतदार ओळखपत्र 3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4) जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.
➤ उत्पन्न दाखला अटींमध्ये शिथिलता :
ज्या लाडक्या बहिणीकडे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल आणी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड आहे त्यांना यापुढे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
➤ पात्र वयोगटामध्ये वाढ :
पहिले पात्र वयोगट २१ ते ६० वर्षे असा होता मात्र यामध्ये बदल करण्यात आला असून २१ ते ६५ वर्षे असा अद्ययावत करण्यात आला आहे याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी.
➤ फोटोबाबत नियम शिथिल :
अर्ज भरतेवेळी ऑनलाईन लाईव्ह फोटो काढताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नव्या निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
➤ महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र :
इतर राज्यांमध्ये जन्मलेल्या परंतु महाराष्ट्रातील रहिवाशांशी विवाह केलेल्या महिला पात्रता सिद्ध करण्यासाठी तिच्या पतीचा जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे वापरू शकतात.
➤ सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
Ladaki Bahin Yojana, Maharashtra Chief Minister's Majhi Ladki Bahin Scheme - Rs 1500 financial benefit is given every month
0 Comments