हेलिकॉप्टर ड्रॉप किंवा मनी कशाला म्हणतात? हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय? Helicopter Money

हेलिकॉप्टर ड्रॉप किंवा मनी कशाला म्हणतात? हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय? What Is Helicopter Drop (Helicopter Money)? हे वित्तीय धोरण आहे जे अर्थव्यवस्थेच्
हेलिकॉप्टर ड्रॉप किंवा मनी कशाला म्हणतात? हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय?

हेलिकॉप्टर ड्रॉप किंवा मनी कशाला म्हणतात? हेलिकॉप्टर मनी म्हणजे काय?

हेलिकॉप्टर मनी हे एक अपारंपरिक चलनविषयक धोरण आहे ज्याचा उद्देश डबघाईला आलेली अर्थव्यवस्था पुन्हा ट्रॅकवर आणने हा आहे.

यामध्ये असे सुचवण्यात आले आहे की, सरकारने मोठ्या प्रमाणात पैसे मुद्रित करायचे (छापायचे) आणि ते लोकांमध्ये वाटप करायचे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमॅन यांनी हा शब्द सर्वप्रथम वापरला.

ही संकल्पना आकाशातून पैशांचा पाऊस पाडत असलेले हेलिकॉप्टर यावर आधारित आहे. फ्रीडमॅनने हा शब्द हे दर्शवण्यासाठी वापरला की, आर्थिक मंदीचा संघर्ष करणार्‍या अर्थव्यवस्थेमध्ये अनपेक्षितपणे पैसे मुद्रित करणे व तिला घसरणीच्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे.

अशा पॉलिसी अंतर्गत, केंद्रीय बँक मागणी आणि पुरवठ्यामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने थेट पैसे पुरवठा वाढवते आणि सरकारमार्फत लोकांमध्ये पैशांचे वाटप करते.

हेलिकॉप्टर ड्रॉप म्हणजे काय? What Is Helicopter Drop (Helicopter Money)?


मिल्टन फ्राइडमॅन यांनी वापरलेला शब्द हेलिकॉप्टर ड्रॉप (हेलिकॉप्टर मनी) म्हणजे चलनवाढ आणि आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी व डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेवटच्या टप्प्यातील आर्थिक वाढीसाठीची रणनीती होय.

जरी हे सैद्धांतिकदृष्ट्या व्यवहार्य आहे असे वाटत असले तरी व्यावहारिक दृष्टिकोनातून हे एक काल्पनिक व अपारंपरिक चलनविषयक धोरण मानले जाते आणि  सिद्धांताची अंमलबजावणी जवळ-जवळ अशक्य आहे असेच मानले जाते.

हेलिकॉप्टर ड्रॉप हे वित्तीय धोरण आहे जे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठ्यात वाढ करून वित्त पुरवठा करते व हा खालावत चाललेल्या अर्थव्यवस्तेला सावरण्याचा एक अंतिम प्रयत्न असतो.

खर्चात किंवा करात कपात होण्याची शक्यता जास्त असू शकते, परंतु यामध्ये अर्थव्यवस्तेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मुद्रित (छापणे) करणे आणि ते लोकांमध्ये वाटप करणे समाविष्ट आहे.

'हेलिकॉप्टर ड्रॉप' किंवा 'हेलिकॉप्टर मनी' हा शब्द मुख्यत्वे अपारंपरिक उपाययोजनांसाठी मंदीच्या काळात अर्थव्यवस्था सुरू किंवा अर्थव्यवस्थेचा बचाव करण्याकरिता जी संकल्पना मांडली गेली त्यामध्ये वापरला जाणारा शब्द आहे.

असे समजले जाते की, जपान हेलिकॉप्टर ड्रॉपचा वापर करण्याचा विचार करत आहे.सध्या जपानने हेलिकॉप्टर ड्रॉपची औपचारिक अंमलबजावणी केली नाही, परंतु त्याऐवजी येत्या काळात मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदीचा पर्याय निवडला असल्याची चर्चा आहे.

'हेलिकॉप्टर ड्रॉप' किंवा 'हेलिकॉप्टर मनी' या संकल्पनेचा वापर किंवा अंमल बजावणी अधिकृतरीत्या कोणत्याही देशाने जाहीर केलेली नाही. परंतु ही संकल्पना अर्थशास्त्रज्ञांचा एक चर्चेचा विषय असतो. अशी चर्चा आहे की जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांनी या संकल्पनेशी निगडित अर्थशास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे.

Post a Comment

0 Comments