| 'एलओसी' व 'एलएसी' यामध्ये फरक काय आहे? What is the difference between LOC and LAC? - Marathi |
'एलओसी' व 'एलएसी' यामध्ये फरक काय आहे? What Is The Difference Between LOC And LAC? - Marathi
चीन आणि पाकिस्तान बरोबर एलएसी व एलओसी बाबत भारताचा नेहमी विवाद होत असतो. याचे मूळ समजून घेण्यासाठी आपल्याला देशाच्या सीमांबद्दल थोडेसे तरी ज्ञान असणे आवश्यक आहे.
आपल्याला माहिती असायला हवे कि, आपल्या देशाच्या सीमा तीन प्रकारांमध्ये विभागल्या आहेत. या सीमांचे एलओसी (LOC), एलएसी (LAC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (International Border) असे नामकरण करण्यात आले आहे.
चला तर मग जाणून घेऊया या तीन प्रकारच्या सीमांचे काय वैशिष्ट्य आहे ते.
आंतरराष्ट्रीय सीमा (International Border)
आंतरराष्ट्रीय सीमा ही दोन किंवा अधिक देशांची अशी सीमा असते जी त्या शेजारच्या देशांना स्पष्टपणे वेगळे करते आणि विशेष म्हणजे यासारख्या सीमांना जगभरातून मान्यता मिळालेली असते.
म्हणजेच, ही एक अशी सीमा असते ज्या सीमेबद्दल त्या सीमेच्या दोन्ही बाजूच्या देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसतो.
म्हणजेच दोन्ही देशांनी या सीमेला आपल्या देशाची सरहद, सीमा मान्य केलेले असते. भारत-चीन, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश आणि भूटान या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भारत देशाला आहेत.
नियंत्रण रेषा - रेखा (LOC - Line of Control)
नियंत्रण रेषा किंवा Line of Control ही भारत - पाकिस्तान मधील सैन्य करारांनुसार अधिकृतपणे कायदा केलेली सीमा आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय समुदायाची या सीमेस मान्यता नाही.
तसेच भारत आणि पाकिस्तान मध्ये जम्मू & काश्मीर च्या हक्कावरून वाद चालू आहे. पाकिस्तानने काश्मीरचा काही भाग बेकायदेशीर पणे ताब्यात घेऊन ठेवला आहे.
जी सीमा जम्मू & काश्मीरला सध्या वेगळे करते त्या सीमेला नियंत्रण रेष (LOC) म्हणतात. १९४७ मध्ये जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेंव्हा संपूर्ण काश्मीर भारताचा भाग होता. फाळणी झाल्यापासून वारंवार दोन्ही देशामध्ये वाद होत राहिले त्यामुळे १९४८ मध्ये हा सीमा विवाद लक्षात घेता दोन्ही देशांनी परस्पर करार करून नियंत्रण रेखा निश्चित केली होती.
असे असूनही पाकिस्तानने १९७१ मध्ये काश्मिरचा एक मोठा भाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला, जो आता पाक व्याप्त काश्मीर (PoK - Pakistan Occupied Kashmir) म्हणून ओळखला जातो.
१९७१ च्या युद्धानंतर १९७२ मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये शिमला करार झाला आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्याने नकाशावर नियंत्रण रेखा (एलओसी) निश्चित केली. परंतु ही अधिकृत सीमा नाही.
एलओसी हा लष्करी नियंत्रणाचा एक असा भाग आहे, जो वादग्रस्त भागापासून दूर राहण्या साठी निश्चित केला आहे. याच LOC वर आजही पाकिस्तान कडून वारंवार गोळीबार होत असतो.
वास्तविक नियंत्रण रेषा - रेखा (LAC - Actual Line of Control)
वास्तविक नियंत्रण रेषा (LAC - Actual Line of Control) नियंत्रण रेषा (LOC - Line of Control) पेक्षा खूपच वेगळी आहे. भारत आणि चीनमधील सीमेला वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) म्हणतात.
LOC प्रमाणे LAC हा दोन देशांनी केलेला संघर्षविराम आहे. या दोघांमधील फरक असा आहे की एलओसी चा स्पष्टपणे नकाशावर उल्लेख केला गेला आहे, परंतु एलएसीची अशी कोणतीही स्पष्ट किंवा अधिकृत सीमा नाही.
म्हणजेच चीनची सेना ज्या ठिकाणी होती तो भाग चायना च्या ताब्यात आणि भारताचे सैन्य ज्या ठिकाणी होते तो भाग भारताच्या ताब्यात असे विवादित विभाजन झाले. हेच कारण आहे की LAC बद्दल नेहमीच वादग्रस्त परिस्तिथी बनलेली असते आणि चिनी सेना नेहमी कोणत्या ना कोणत्या भारतीय भूभागावर आपला दावा ठोकत असते.
अलीकडील डोकलाम विवाद व सध्या सुरु असलेला (जून २०२०) लद्दाख (लडाक) मधील गलवान विवाद हा त्याचाच एक भाग आहे.
१९६२ च्या युद्धानंतर चिनी सैन्य जिथं होते, ते वास्तविक नियंत्रण रेखा (LAC) म्हणून स्वीकारले गेले. या युद्धामध्ये चीनने भारताच्या अखत्यारीत असलेल्या अक्साई चीनला (खरं तर "अक्साई भारत" म्हणायला पाहिजे) ताब्यात घेतले. याच करणामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय एलएसी ला मान्यता देत नाही.
0 Comments